April 18, 2025
शेतकरी

जाणीव फाउंडेशन तर्फे शेतकरी सन्मान उपक्रम

मोताळा : कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीतसुद्धा लॉक डाऊन मध्ये ही देशाला अन्नधान्याची कोणत्याही प्रकारची उणीव भासु न देनार्या, अन्न धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांचा सन्मान व्हावा असा उपक्रम जाणीव फाऊंडेशनी सुरू केला आहे व दरमहा निराधार, गरजूसोबत शेतकरी सन्मान उपक्रम सुद्धा जाणिव फाऊंडेशन हाती घेतला. त्याप्रमाणे पेरणीच्या सुरुवातीलाच मोताळा तालुक्यातील ग्राम राहेरा येथील आदिवासी बहुल भागातील शेतकरी अवचित राव बर्डे , परसराम माळी,देविदास बरडे, एकनाथ बर्डे, शामराव बर्डे ह्या पाच शेतकऱ्यांचा जाणीव चे मनोज यादव,दीपाली सोनोने,गौरव लोखंडे,नितीन गवई, प्रांजली धोरण याँनी
त्यांच्या बांधावर जाऊन सन्मान केला. शेला,टोपी व श्रीफळ, 500 Rs असे सन्मानाचे स्वरूप होते दर महीना ला असा एक छोटा प्रयत्न जाणीव कडून असा करन्या चे आता ठरवले आहे. यावेळी सदर शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले.जूलै 2018 पासून जाणीव फाउंडेशन कडुन निराधार महिला, आर्थिक दृष्ट्या अक्षम यांना दरमहा किराणा किंवा आर्थिक स्वरूपात मदत केली जाते. शेतकऱ्यांचा त्यांच्या बांधावर जावुन सन्मान करणे हा नाविन्य पुर्ण उपक्रम जाणिव च्या प्रत्येक सदस्याच्या सहभागातून शक्य झाले आहे जाणिवचा प्रत्येक सदस्य योगदान देत असून आम्ही फक्त माध्यम आहोत असे मत जाणीव फाउंडेशन अध्यक्षा प्रांजली धोरण व्यक्त केले.

Related posts

पंजाब-हरियाणाच्या शेतकरी बांधवांना ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या’ वतीने यशवंत गोसावी यांचे पत्र….!!

nirbhid swarajya

खामगांव पंचायत समिती समोर संगणक परिचालकाचे निषेध आंदोलन

nirbhid swarajya

कपाशी पीक जळाल्याने शंभर टक्के नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी…

nirbhid swarajya
error: Content is protected !!