November 20, 2025
क्रीडा खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शिक्षण

जागतिक महिला दिनानिमित्त महिला शिक्षिकांचा सन्मान…

जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलरचा उपक्रम…

खामगांव:– शैक्षणिक क्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक मिळविलेल्या प्रा. रामकृष्ण गुंजकर सरांच्या जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर आवार येथे आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला.यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर तसेच संस्थेच्या सचिव प्राध्यापक सुरेखा गुंजकर मॅडमच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन महिला शिक्षिकांचा सन्मान करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच गुंजकर कॉलेजच्या बारावी सायन्सच्या सर्व विद्यार्थीनींना देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर, गुंजकर कॉलेजचे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. अशी माहिती कॉलेजचे प्रसिद्धीप्रमुख नवनीत फुंडकर यांनी दिली आहे.

Related posts

व्यवसायिक प्रदीप राठी ला १८ महिन्यानंतर सशर्त जामीन…

nirbhid swarajya

खामगांव MIDC मधे पकडला 34 लाखाचा गुटखा

nirbhid swarajya

कोविड लसीकरणाच्या तयारीसाठी ‘रंगीत तालीम’

nirbhid swarajya
error: Content is protected !!