खामगाव :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजात वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. महिलांमध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी उंच भरारी घ्यावी आणि स्वबळावर अस्तित्व निर्माण करावे हाच उद्देश या उपक्रमांचा आहे, व हाच प्रेरणादायी विचार स्त्रियांमध्ये निर्माण होण्यासाठी खामगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय महिला मंडळ यांच्या वतीने विविध क्षेत्रातील पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला गेला. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुरेखा धनोकार यांनी महिलांनी स्वतःसाठी तयार व्हावे व प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवावा, स्वतःच्या हक्कांसाठी स्वतः पुढाकार घ्यावा असे बोलताना सांगितले.या कार्यक्रमामधे अध्यक्षा सौ. मनकर्णा म्हसने तर प्रमुख सौ. संगीता लोखंडे या होत्या. वेगवेगळ्या क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वान महिला सौ रत्नाताई राजेश लोखंडे (सरकारी वकील) ,कु.वर्षा सुदामदेव पल्हाडे (मॅनेजर), सौ.रत्ना लोखंडे (नाजर वित्त ,लेखा विभाग ) सौ. मनकर्णा उत्तम म्हसने (अध्यक्ष क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय महिला) ,सौ.सुलोचना वसंत लोखंडे (सत्कारमूर्ती) यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.ज्योती धनोकार, कार्यक्रमाचे स्वागतगीत सुशीला म्हसने यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या वेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय महिला मंडळाच्या सौ. वैशाली दिनकर पल्हाडे ,सौ.सुनंदा धनोकार, सौ.ज्योती धनोकार ,सौ.संगीता सुरेश लोखंडे,सौ.वनश्री हुसे , सौ.रुक्मिणी पल्हाडे, सौ.मीना वाढोकार, सौ.ज्योती घाटोळ, सौ.महानंदा घाटोळ, सौ.रेखा म्हसने, सौ.शारदा म्हसने , सौ.सुशीला म्हसने, सौ.सुरेखा धनोकार, सौ.कमलबाई काठोले यांच्यासह आदी महिलांची उपस्थिती होती.