जागतिक महिला दिनाचा उदय एका कामगार आंदोलनातून झाला. 1908 साली याची सुरुवात झाली होती. महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती.याशिवाय त्यांच्या इतर प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या होत्या – चांगलं वेतन मिळावं आणि मतदानाचा अधिकार मिळावा.या आंदोलनाच्या वर्षभरानंतर अमेरिकेतल्या सोशालिस्ट पक्षाने 8 मार्च हा पहिला राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला.हा दिवस आंतरराष्ट्रीय म्हणून साजरा करण्याची कल्पना सुचली आणि ही कल्पनासुद्धा एका स्त्रीचीच होती. क्लारा जेटकीन यांनी 1910 साली कोपनहेगनमध्ये झालेल्या काम करणाऱ्या महिलांसाठीच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्या परिषदेत 17 देशांच्या 100 महिला सहभागी झाल्या होत्या. त्या सर्वांनीच प्रस्तावाला अनुमोदन दिलं.क्लारा जेटकीनसर्वप्रथम 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला होता. 1975 साली संयुक्त राष्ट्रांनी हा एक वार्षिक उत्सव म्हणून थीमसह साजरा करायला सुरुवात केली. त्यावेळी या जागतिक महिला दिनाला अधिकृत मान्यता मिळाली.पहिल्या जागतिक महिला दिनाची थीम होती ‘Celebrating the Past, Planing for the Future’ (भूतकाळाचा आनंद, भविष्यासाठी योजना).तसेच1917 साली युद्धादरम्यान रशियाच्या महिलांनी ‘ब्रेड आणि पीस’ (भाकरी आणि शांतता) अशी मागणी केली. महिलांनी केलेल्या कामबंद आंदोलनाने सम्राट निकोलसला पद सोडायला भाग पाडलं आणि त्यानंतर आलेल्या हंगामी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला.त्यावेळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरलं जायचं. ज्या दिवशी महिलांनी कामबंद आंदोलन पुकारलं ती तारीख होती 23 फेब्रुवारी. ग्रेगरियन कॅलेंडरनुसार हा दिवस 8 मार्च होता आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.