लोणार : कोरोना विषाणूमुळे अख्या जगावर मोठे संकट ओढवले आहे. जग, देश आणि महाराष्ट्र या विषाणूचा सामना करत आहे. कोणी कल्पनाही केली नसेल एवढे बदल या विषाणूने घडवून आणले आहेत. या विषाणूने अनेकांच्या हातचा घास हिरावला तर अनेक हातांना बेरोजगारही केले तसेच अनेकांच्या मुहूर्तावर पाणीही फिरवलं मात्र या अशा परिस्थितीतही काही विवाह होत आहेत यातीलच काही विवाह समाजासमोर आदर्शही ठेऊन जात आहेत. लॉकडाऊन काळात लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील लग्नाची सध्या चर्चा व कौतुक केले जात आहे. किनगाव जट्टू येथील तंटामुक्ती अध्यक्ष राजू नागरे यांची कन्या मीनाक्षी ही परिचारिका आहे. विशेष म्हणजे परिचारिका दिनीच वधू मीनाक्षी व वर गणेश कराड यांचा हा आदर्श विवाह सोहळा सोशल डिस्टनसिंगचे पालन करत पार पडला. या दाम्पत्याने मास्क लावून विवाहाच्या ठिकाणी प्रवेश केला.
मास्क लावून विवाहाच्या ठिकाणी प्रवेश केला. या विवाह सोहळ्यासाठी लोणारचे नायब तहसीलदार हेमंत पाटील, बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार एल डी तावडे, तहसिलचे कर्मचारी गणेश नागरे, ग्रामविकास अधिकारी अविनाश नवले, माजी सभापती रामदास मुरतडकर, उपसभापती अरुणा ताई महाजन, उपसरपंच जानकाबाई महाजन, काळु मुंढे, सहदेव लाड यांसह मुला – मुलिकडील मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. मीनाक्षी नागरे या परिचारिकेची विवाह जागतिक परिचारिका दिनाच्या दिवशीच सोशल डिस्टनसिंगचे पालन करत पार पडल्याने या आदर्श विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.