निसर्गाची समृध्दी गृपचा स्तुत्य़ उपक्रम.
खामगांव -निसर्गाची समृध्दी हा ग्रृप मागील ४ वर्षापासून निसर्ग संवर्धनासाठी कार्य करीत आहे. आज रविवार दि.२० मार्च २०२२ रोजी “जागतिक चिमणी दिवस” आहे. या निमीत्य़ “जय श्रीराम फ्रुटस” जलंब नाका, नांदुरा रोड, खामगांव येथे नाममात्र किमतीवर चिमणीसाठी खोपे व पक्षांना पाणी पिण्याचे भांडे विक्रीस उपलब्ध़ राहणार आहे, अशी माहिती “निसर्गाची समृध्दी” ग्रृपच्या संस्थापक समृध्दी जितेंद्र कुयरे यांनी दिली आहे.मागील चार वर्षापासून उपरोक्त़ ग्रुप निसर्ग संवर्धनासाठी कार्य करीत आहे. पहिल्या वर्षी निसर्गाची संमृध्दी ग्रृपच्या वतीने बोथा जंगल येथे एकुण २७५० सिडबॉलची पेरणी केली होती. परंतु त्यावर्षी अत्यल्प़ पाऊस पडून देखील त्यापैकी जवळपास १५० झाडे उगवली व आज ती झाडे जवळपास ४ वर्षाची झाली आहेत. मागील २ वर्षापासून कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक कार्यक्रम घेता आले नाहीत परंतु ऑनलाईन कार्यक्रमाव्दारे निसर्ग संवर्धनाचे उपाय व जनजागृतीचे काम करण्यात आले.
या गृपमध्ये वय वर्ष ५ ते २१ या वयोगटातील मुले मुली असून इतक्या लहान वयाच्या मुलांमध्ये निसर्ग संवर्धनाचे धडे गिरवण्याचे काम करण्यात येत आहे.
या ग्रृपव्दारे रविवार आज दि.२० मार्च रोजी जागतीक चिमणी दिवसा निमीत्य़ जय श्रीराम फ्रुटस, जलंब नाका, नांदुरा रोड, खामगांव येथे सकाळी १०.०० ते दु.१.०० वा पर्यंत ग्रृपव्दारे विशेष आकाराचे बनवून घेतलेले जवळपास १५० चिमण्यांचे खोपे व पिण्याचे भांडे विक्रीस उपलब्ध़ होणार आहे. या विक्रीतुन मिळालेल्या रक्कमेतून दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पावसाळयापुर्वी जंगलातील टेकडी किंवा खुल्या जागेवर झाडे लावण्याचे काम हे लहानगे करणार आहे. या सर्व लहानग्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपलब्ध़ चिमणीचे खोपे व पक्षांना पिण्याचे भांडे विकत घेऊन आर्थीक सहकार्य करावे. तसेच ज्यांना लहानग्यांच्या या उपक्रमासाठी मदत देण्याची इच्छा असेल त्यांनी गुगल पे किंवा फोन पे व्दारे ९४२२२००००८ या नंबर वर योगदान दयावे ही विनंती. तसेच उपरोक्त़ उपक्रमासाठी स्वयंसेवक बनु इच्छीणाऱ्या ५ते १५ वयोगटातील लहान मुलामुलींनी रविवार दि.२० मार्च २०२२ रोजी सकाळी ९.३० वा जलंब नाका येथे उपस्थित रहावे ही विंनती.अशी माहिती समृध्दी जितेंद्र कुयरे,निसर्गाची समृध्दी खामगांव यांनी दिली आहे