शासनाने केली व्यवस्था
शेगांव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने बुलडाणा जिल्ह्यातील २१ विद्यार्थी आणि ३ शिक्षक हरियाणा राज्यातील चेंबा या शहरात अडकले होते. या विद्यार्थ्यांना आज गुरुवारी सुखरूप परत आणले आहे. हे सर्व विद्यार्थी हे शेगाव तालुक्यात असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. यामुळे त्याचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले होते. या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केल्या गेले व आज गुरुवारी शेगाव आगाराच्या शिवशाही बस ने त्यांना आणण्यात आले.
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील चिंचोली गावात असलेल्या एकमेव जवाहर नवोदय विद्यालयातील नवव्या वर्गात शिकणारे २१ विद्यार्थी हरियाणा राज्यातील चेंबा येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी गेले होते. ३१ मार्च रोजी त्यांचा शैक्षणिक कार्यकाळ संपणार होता. मात्र त्यापूर्वीच देशभरात लॉकडाऊन ची स्थिती निर्माण झाल्याने तेथील विद्यालयातील सर्व विद्यार्थी आपल्या घरी पाठविले गेले मात्र बुलडाणा जिल्ह्यातील २१ विद्यार्थ्यांना तेथील प्रशासनाने परत पाठवले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी सध्या तेथे अडकून पडले होते. तर तीन शिक्षकही तेथेच अडकले होते. यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले होते. या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केल्या गेले व आज गुरुवारी शेगाव आगराच्या शिवशाही बस ने पहाटे त्यांना आणण्यात आले. विद्यार्थी परतल्याने त्यांच्या पालकांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आभार मानले आहेत.