शेगावच्या कोरोना पॉझिटिव्हची पत्नी पण पॉझिटिव्ह
बुलडाणा/खामगाव :-शेगावकरांच्या चिंतेत भर घालणारी बातमी आली आहे ती म्हणजे ४ दिवसांपूर्वी शेगाव येथे आढळलेल्या सफाई काम करणाऱ्या व्यक्तीची पत्नी सुद्धा पॉझिटिव्ह आढळली आहे. आज बुधवारी त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे त्यांच्या संपर्कातील २९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. याचप्रमाणे जळगाव जामोद येथील कोरोनाबाधित रुग्णाला आज खामगावच्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शेगाव, खामगाव आणि जळगाव जामोद या शहरांमध्ये मागील काही दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते यामध्ये जळगाव जामोद येथील रुग्ण हा मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर शहरात जाऊन आल्याने त्याला तो पॉझिटिव्ह आढळला होता त्याच्यावर खामगाव येथील कोविड रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत होते. त्याचा कार्यकाळ पूर्ण संपल्याने आणि त्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्याला नियमा प्रमाणे रुग्णालयाततुन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रेमचंद पंडित व रुग्णालयाचा सर्व स्टाफ यांनी टाळ्या वाजवुन त्याला डिस्चार्ज देण्यात आला. दुसरीकडे शेगाव येथील नगरपालिकेचा सफाई कर्मचारी हा पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच्यावर शेगांव येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे २९ व्यक्तींचे रिपोर्ट्स आज प्राप्त झाले असून यामध्ये सफाई कामगाराची पत्नी ही पॉझिटिव आढळल्याने आता जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा ३२ झाला आहे त्यातील २४ रुग्णांना सुट्टी देण्यात आली ३ रुग्णांचा मृत्यू तर एक्टीव्ह रुग्णांची संख्या ५ वर पोहोचली आहे अशी माहिती डॉ प्रेमचंद पंडित (जिल्हा शल्य चिकित्सक) यांनी दिली आहे.