जळगांव जा. : कोरोना च्या संकट काळात रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी 29 मे रोजी स्थानिक पंचायत समिती द्वारा आयोजित रक्तदान शिबिर मध्ये 100 रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले. 16 मे रोजी विस्तार अधिकारी संदीप मोरे यांनी कोरोना प्रादुर्भावात आपण एक पाऊल आणखी पुढे असावे म्हणून सर्व मंडळी सोबत मेसेज करून चर्चा केली व सर्वांनी त्यास प्रतिसाद देत गटविकास अधिकारी भारसाकडे यांनी सर्व कार्यालय व पदाधिकारी यांना सुद्धा रक्तदान करण्यास प्रेरित केले. त्याला प्रतिसाद देत सरपंच संघटना, ग्रामसेवक संघटना, केंद्रचालक रोजगार सेवक ग्रामपंचायत कर्मचारी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांचे पंचायत विभाग जळगाव च्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिरात इच्छुक 100 लोकांचे रक्तदान करण्यात आले. या शिबिरास सर्व जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, सभापती आदी हजर होते तसेच सामान्य रुग्णालय खामगाव च्या डॉ. प्रणाली देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी उज्वला पाटोल, डॉ. विष्णु मुंढे, डॉ.दीपक केदार, राजश्री पाटील, ज्योती नाटेकर आदी उपस्थित होते.
ReplyForward |