October 6, 2025
क्रीडा खामगाव बातम्या बुलडाणा शिक्षण

जलदिनानिमित्त चिखली बु येथे कलश यात्रा

खामगाव:आज दि. २२ मार्च रोजी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा चिखली बु येथे जागतिक जलदिन वरिष्ठांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनानुसार मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.शुद्ध आणि सुरक्षित पाण्याचे महत्व सर्वांपर्यंत पोहचणे गरजेचे असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर होणे काळाची गरज आहे. त्यासाठी दि. २२ मार्च रोजी खामगाव तालुक्यातील आणि सुजातपुर ग्रामपंचायत अंतर्गत मराठी प्राथमिक शाळा चिखली बु येथे जास्तीत जास्त लोकसहभागासह पाण्याचे कलश पुजन करण्यात आले, जलप्रतिज्ञा घेण्यात आली, शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. प्रभात फेरी दरम्यान जलजीवन मिशन तसेच स्वच्छ भारत मिशनचे घोषवाक्यासह जाणीव जागृती करण्यात आली.ह्याप्रसंगी चिखली बु येथील शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष किशोर कळसकार उपाध्यक्ष राजेंद्र मानकर, शिक्षण तज्ज्ञ बाळूभाऊ मानकर मुख्याध्यापक संतोष निलखन,सहायक अध्यापिका शितल बोंबटकार व गावातील युवा कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले

Related posts

टाकळी हाट येथे समस्या सोडविण्याबाबत ग्रामस्थांनी दिले तहसीलदारांना निवेदन..

nirbhid swarajya

Fashion | ‘Ironic Pink’ And 4 Other Back-To-School Trends

admin

न प सफाई कामगार व कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

nirbhid swarajya
error: Content is protected !!