अवैध रेती वाहतुक करणाऱ्या टिप्पर ने पोलिसाला उडविले प्रकरण
शेगांव : अवैध रेती वाहतूक करणार्या टिप्पर ला थांबविण्यासाठी हाथ देणाऱ्या पोलिसाला टिप्पर चालकाने टिप्पर अंगावर टाकून ठार केले या घटनेत पोलिसांनी आरोपींना अटक करून खुनाचा गुन्हा नोंदविला असून हि घटना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गंभीरतेते घेऊन जलंब पो.स्टे चे ठाणेदार गौतम इंगळे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
बुधवारी पहाटे च्या सुमारास शेगांव तालुक्यातील माटरगाव, भास्तन गावाजवळील पूर्णा नदीमधून रेतीची चोरी करून खामगांव शहरकडे जात असल्याची माहिती जलंब पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल उमेश सिरसाट यांना मिळाल्यावरून त्यांनी एका होमगार्डला सोबत घेऊन मोटरसायकलने भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्पर चा पाठलाग केला सदर टिप्पर हा माटरगाव या गावाच्या पुढे पोहचलेला असताना शिरसाठ यांनी ते वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन थांबविले नाही, दरम्यान टिप्पर चालकाने आपले वाहन थेट पोलीस कॉन्स्टेबल उमेश सिरसाट यांच्या अंगावरून पुढे नेले. यात सिरसाट यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी टिप्पर चालकासह मालक आणि टिप्पर मध्ये बसलेल्या अश्या एकूण ५ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. टिप्पर पोलिसांनी जप्त केले आहे तर सदर प्रकरण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी अत्यंत गंभीरतेने घेतले असून निष्काळजीपणा, हलगर्जीपणा तसेच अवैध रेती उत्खनन कडे दुर्लक्ष करण्याचा ठपका ठेवून जलंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार गौतम इंगळे यांना निलंबित आणि यांची कंट्रोल रूम ला तडकाफडकी बदली केली आहे आहे. त्यांच्या जागी यवतमाळ येथून बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेत दाखल झालेले सहा पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे यांची बदली करण्यात आली आहे.