रात्री होत आहे रेतीची तस्करी,माक्ता-कोक्ता शिवारात सुरू आहे क्लब
खामगाव -: जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत वरली मटका,जुगार,गुटखा,अवैध दारू विक्री आधी अवैध धंदे जोमात सुरू आहेत.दिवसा रेती वाहतूक बंद दिसत असली तरी रात्री अपरात्री रेतीची तस्करी सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. लक्ष्मी दर्शनामुळे पोलिसांचे अवैध धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.मात्र यामुळे सर्वसामान्य जनता नागविल्या जात आहे.जलंब पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जलंब,माटरगाव,पहुरजीरा,माक्ता-कोक्ता सह बरीच लहान मोठी गावे येतात यामध्ये बहुतांश ठिकाणी वरील प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत.एकीकडे ग्रामीण भागातील जनता बेरोजगारीचा सामना करीत आहे.तर शेतकरी अस्मानी सुलतानी संकटांशी सामना करीत नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे सर्वसामान्यांचे संसार उघड्यावर पडत आहेत.तर तरुण पिढी ही व्यसनाच्या आहारी जात आहे.धंद्यांमुळे चोरी चपात्यांचे प्रमाणही वाढले आहे.व्यसनाच्या आहारी गेलेले, बेरोजगारीमुळे पैशांची गरज भागविण्यासाठी भुरट्या चोऱ्या करीत आहेत.अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी सूज्ञ नागरिकांनी कितीही ओरड केली तरी काही उपयोग होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.माक्ता- कोक्ता शिवारात अनेक दिवसापासून एका घरात पत्ताच्या क्लब सुरू आहे.याबाबत नागरिकांनी अनेक वेळया तक्रारी करून सुद्धा ठाणेदार यांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे.असा आरोपी नागरिक करीत आहे. तसेच भास्तन येथील पूर्णा नदीपात्रातून रेती तस्करी चा प्रकार नवीन नाही.परंतु सध्या जिल्हा महसूल प्रशासनाने रेती तस्करी विरोधात कंबर कसली आहे.त्यामुळे दिवसा जरी रेती वाहतूक बंद दिसत असली तरी रात्री मात्र जोमात तस्करी होत आहे.विशेष बाब म्हणजे रेती तस्करीने एका पोलीस कर्मचाऱ्याचा बळी घेतला असल्याचा या पोलीस स्टेशन चा इतिहास आहे.मात्र लक्ष्मी मोहापोटी याकडे दुर्लक्ष केले जात आहे.यापूर्वी तत्कालीन ठाणेदार धीरज पांडे यांच्या कार्यकाळात काही प्रमाणात का होईना अवैध धंदयांना लगाम लावण्यात आला होता.परंतु आता ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या कार्यकाळात जणूकाही अवैध धंदेवाईकांना रान मोकळे झाल्याचे दिसून येत आहे.या कडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन दोन नंबर धंद्यांना आळा घालण्याची मागणी नागरिक करीत आहे.