April 11, 2025
Featured

जगाला कट, कॉपी आणि पेस्ट (‘Cut, Copy, Paste’) हे शब्द देणारे वैज्ञानिक लॅरी टेस्लर यांचं निधन


तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरच्या की बोर्डवर, मोबाइलच्या स्क्रीनवरवर आणि लॅपटॉवर वारंवार ज्या शब्दाचा वापर करण्यात येतो. अशा कट, कॉपी आणि पेस्ट (‘Cut, Copy, Paste’) हे शब्द जगाला देणारे लॅरी टेस्लर यांचं निधन झालं. ते ७४ वर्षाचे होते. लॅरी टेस्लर हे एक कम्प्यूटरचे वैज्ञानिक होते. त्यांनी स्टेनफॉर्ड विद्यापीठातून ह्युमन कम्प्यूटर इंटरेक्शनमध्ये पदवी मिळवली होती. त्यांनी Xerox मध्ये खूप मोठा काळ घालवला. त्यानंतर त्यांनी अॅपल, अॅमेझॉन आणि याहू सारख्या कंपन्यात आपले योगदान दिले. कट आणि पेस्ट जुन्या काळात एक जुगाड सारखे होते. ज्यात प्रिंट झालेल्या कागदाचा एक भाग कापून दुसऱ्या भागाला चिकटवला जात असत. परंतु, १९८३ साली अॅपलने लिसा कम्प्यूटरने आपले एक सॉफ्टवेअरचा वापर केला होता. त्यात लॅरी याचं कट, कॉपी आणि पेस्ट लोकप्रिय झाले. लॅरी यांनी अॅपलमध्ये जवळपास १७ वर्ष सेवा दिली. Attachments area

Related posts

लोकांनी घरात राहावं यासाठी रशियाने रस्त्यावर सोडले 800 वाघ-सिंह?

nirbhid swarajya

जागतिक महिला दिनाची सुरुवात कशी झाली?

nirbhid swarajya

The iPhone 8 May Be Bigger Than The iPhone 7, Its Predecessor

admin
error: Content is protected !!