खामगाव-: सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस व पोस्ट टाकल्या प्रकरणी एका २० वर्षीय आरोपीस खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.पोस्ट टाकल्यानंतर खामगाव शहरात मोठ्या प्रमाणात अनसंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते.पोस्ट टाकणाऱ्या आरोपी विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी या करीता विविध मंडळाचे व संघटनाचे पदाधिकारी,कार्यकर्ते पोलिस ठाण्यात दाखल झाले होते.खामगाव शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्या आधीच खामगाव शहर पोलिसांनी फैजल खान नामक आरोपी विरुद्ध विविधी कलमा प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.त्याच्या विरोधात पोलीस पुढील तपास करत आहे.