राजर्षी शाहू महाराजांनी शैक्षणिक क्षेत्रात अलौकिक कार्य केले आहे. राजेंनी स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून राजाज्ञा काढली, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ भरघोस मदत केली. असे कित्येक कार्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी केले आहेत. अश्या या थोर राजेंनी आपल्या खामगांव ला देखील भेट दिली होती. छत्रपती राजश्री शाहू महाराज हे खामगाव येथे अखिल भारतीय बहुजन शिक्षण परिषदेच्या अकराव्या अधिवेशनासाठी खामगाव येथे आले होते. २७ डिसेंबर १९१७ साली भरलेल्या त्या अधिवेशनाचे अध्यक्ष शाहू महाराज होते. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असा संदेश यावेळी राजश्री शाहू महाराज यांनी त्यावेळी खामगाव मध्ये दिला होता. त्यांच्या या ऐतिहासिक भेटीची राजश्री शाहू स्मारक ग्रंथात नोंद पुस्तकाचे संपादक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी घेतली आहे. या भेटीला आता एकशे तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. श्री. रावबहादुर देशमुख यांचे देखील शिक्षण,सामाजिक क्षेत्रातील कार्य देखील खूप मोठे आहे. यांचे सध्याचे वंशज देवेंद्रजी देशमुख यांनी देखील शाहू महाराज यांच्या आठवणी जश्याच्या तश्या जोपासून ठेवल्या आहेत. या सर्व बाबींना उजाळा देण्यासाठी आम्ही निर्भिड स्वराज्य तर्फे लाइव्ह करून एक छोटासा प्रयत्न केला. या प्रयत्नात प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद आम्हाला दिला. आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी राजे यांनी देखील हे लाइव्ह बघितले. खरे तर निर्भिड स्वराज्य ची सुरुवात १२ जानेवारी २०२० ला राजमाता जिजाऊ जन्मदिनी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात शिवधर्म पीठावर युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, छत्रपती यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले, युवराज्ञी संयोगिता संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते झाली होती आणि आज आमचे कार्य देखील त्यांच्यापर्यंत पोहोचले यापेक्षा आनंदाची गोष्ट आमच्यासाठी नाहीये. असेच कार्य आम्ही यापुढे ही आणि अधिक जोमाने करीत राहू..!
– साक्षी संजय गोळे पाटील (संपादिका निर्भिड स्वराज्य)