खामगांव: कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर सुरूवातीला देशी व विदेशी दारुचे दुकान लॉकडाऊन झाले असतांना देशात व राज्यात कुठेही दारू दुकाने व बिअर बार यांना दारूविक्रीची परवानगी नसतांना शहरात मात्र सर्रास दुकानांमधुन दारू विक्री होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. प्राप्त तक्रारीवरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरात छापे टाकून संबंधित दुकानांविरुद्ध कारवाई केली.यामध्ये चौधरी वाईन शॉपचा सुद्धा समावेश होता. यानंतर चौधरी वाईन शॉप संचालकांना अटी व शर्तीच्या अधिन राहुन दारू विक्रीची तात्पुर्ती परवानगी देण्यात आली होती. मात्र चौधरी वाईन शॉपमधून परवाना नसलेल्या ग्राहकांना देशी-विदेशी दारूची विक्री होत असून बिलही देण्यात येत नाही अशी तक्रार स्थानिक सामाजिक कार्यकर्ते भिकुलाल जैन केली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचुन बनावट ग्राहकाला चौधरी वाईन शॉपमध्ये पाठविले. यावेळी त्या ग्राहकाला ५०० रूपयाची नोट घेऊन दारू देत असतांना अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी परवाना नसलेल्या ग्राहकांना दारू विक्री होत असल्याचे दिसून आले.ही कारवाई निरिक्षक गणेश गावडे व त्यांचे सहकारी सोनकांबळे,प्रदीप देशमुख, गणेश मोरे व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी यांनी केली.गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी यांनी दारू च्या दुकांनाचे लायसन्स रद्द केले होते,त्या नंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तानी सदर आदेश रद्द केले होते.त्या मधे या दुकानांचा समावेश होता हे विशेष..