November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शेगांव

चोरट्यांनी चोरलेल्या गाड्या सापडल्या विहिरीत…

खामगाव : वेगवेगळ्या भागातून दुचाकी लंपास करणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.दुचाकीचे स्पेअरपार्ट काढून चोरटे विहिरीत फेकत होते.शेगाव रस्त्यावर विहिरीतून पोलिसांनी दुचाकी काढणे सुरू केले आहे.मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रणाण वाढलं आहे.दुचाकी चोरणारी टोळीच बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय होती.दरम्यान पोलिसांनी शेगाव येथील ईदगाह प्लॉट परिसरात राहणाऱ्या सैय्यद वसिम सैय्यद इस्लाम ( ३८ ) याला ताब्यात घेवुन दुचाकी चोरीबाबत विचारपूस केली होती.यावेळी सैय्यद वसिम याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसी हिसका दाखवला असता सैय्यद वसिम पोपटाप्रमाणे बोलू लागला व गुन्ह्यांची कबुली दिली. काही दुचाक्यांची मोडतोड केली असल्याचीही माहिती दिली. त्याच्या सोबत आणखी काही जण या टोळीत असून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही टोळी दुचाकीचे वेगवेगळे पार्ट करून नंतर दुचाकी विहीरीत टाकत होते. चौकशीत ही माहिती उघड झाली चोरट्यांनी दिलेल्या माहितीच्या शेगाव ते वरवट बकाल रस्त्यावर एका शेतातील विहीरीतून पोलिसांनी दुचाकी काढणे सुरू केले आहे. उपविभागीय अधिकारी अमोल कोळी यांच्यासह खामगाव आणि शेगाव येथील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालेलं असून आणखी एका विहिरीत सुद्धा अश्या दुचाकी असल्याची माहिती आहे.

Related posts

दुकाने उघडण्याचे परवानगीसाठी नाभिक समाजाचे निवेदन

nirbhid swarajya

आरटीई. प्रतिपूर्तीची रक्कम नमिळाल्याने इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचे(मेस्टा) धरणे आंदोलन

nirbhid swarajya

संत तुकाराम बीज निमित्त हवामान अभ्यासक पंजाब डख यांचे कृषी व्याख्यान!

nirbhid swarajya
error: Content is protected !!