खामगाव: खामगाव तालुक्यातील गणेशपुर जवळ चारचाकी गाडी पलटी झाल्याने एकाचा मृत्यू झाला असल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नांदुरा येथील प्रसिध्द कंत्राटदार सुभाष मोहता हे आज दुपारी १२:३० च्या सुमारास आपल्या श्रेयस नामक मुलासोबत चिखली येथून खामगावकडे येत असताना गणेशपूर नजीक त्यांचे वाहनावरिल नियंत्रण सुटल्याने त्यांच्या कारला अपघात झाला. या भीषण अपघातात सुभाष मोहता जागीच ठार झाले. तर त्यांचा श्रेयस मोहता नामक मुलगा गंभीर जखमी झाला. श्रेयस मोहता यांच्यावर खामगाव येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर अपघात इतका जोरदार होता की यामधे गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
previous post