चिखली : विदर्भातील पहिल्या नागरी सहकारी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीशभाऊ गुप्त यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात झाला असून, त्यामध्ये त्यांच्यासमवेत असलेले बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे व स्वतः सतीश गुप्त हे गंभीररित्या जखमी झाले आहे. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान हल्लेखोर गुप्त यांची ईनोवा गाडी व सोने-नाणे आणि पैसे वस्तू घेऊन पसार होत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली व त्यामध्ये एक हल्लेखोर ठार झाल्याचे समजते तर इतर तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले असल्याची प्राथमिक माहिती आहे. बँकेचे अध्यक्ष सतीशभाऊ गुप्ता व उपाध्यक्ष पुरुषोत्तमजी दिवटे हे काल रात्री शुक्रवारी १२.३० च्या सुमारास नांदगाव येथील शाखा सल्लागार समितीची बैठक आटोपून औरंगाबाद येथे मुक्कामी येत असतांना औरंगाबाद पासून २५ किलोमीटर अंतरावर त्यांच्या गाडीवर दरोडा घालून मा. सतीशभाऊंवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दिवटे सर व चालकाला जबर मारहाण करण्यात आली, तसेच गाडीमधील पैसे, रिव्हॉल्व्हर, काडतुस व इनोव्हा गाडी दरोडेखोरांनी पळवून नेली. सध्या सतीशभाऊ गुप्त, दिवटे सरांची व चालकाची प्रकृती उत्तम असून सतीशभाऊ यांच्यावर सिटी केअर हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, अशी माहिती बँकेच्या वतीने करण्यात आली आहे. दरोडेखोरांना पोलिसांनी गाडी व मुद्देमालासह अटक केल्याचे समजते.
previous post