खामगाव : खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडली.यावेळी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक व स्थानिक पत्रकार उपस्थित होते .यावेळी मुख्याध्यापक यांनी प्रक्रियेला सुरुवात केली असता निवड प्रक्रियेचा शासन निर्णयाचे नियम बाजूला ठेवून स्वतःच्या मनाने निवड प्रक्रिया केल्याची धक्कादायक बाब समोर आली. यामध्ये त्यांनी अपंग प्रतिनिधी घेणे हे अनिवार्य असताना त्यासाठी अपंग विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रतिनिधित्व दिले नाही.पालकांनी पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ञ घेणे ही अनिवार्य होते.आरक्षण हे शिक्षकाकडूनच काढण्यात आले,आरक्षित जागेवर निवडलेले सदस्य हे त्याच प्रवर्गातील आहेत की नाही याची खात्री करण्यात आली नाही.आणि निवड प्रक्रियेत गोंधळ करण्यात आला निवड प्रक्रियेदरम्यान पत्रकारांनाही बसू न देता त्यांचा अवमान करण्यात आला.तसेच यावेळी जमलेल्या पालकांनी शाळेत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.आणि शाळेतील दोन एलईडी टीव्ही चोरीला गेला गेल्या आहेत.त्याचा अजून कसा तपास लागला नाही आणि अनेक शिक्षकही मुख्यालय राहत नाहीत असे गावकऱ्यांनी ओरड केली.परंतु मुख्याध्यापक महोदय हे स्थानिक रहिवासी असून गावात व शाळेत राजकारण करतात अशी ओरड काही पालकांनी व स्थानिक रहिवाशांनी केली आहे .