November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

कारची कंटेनरला धडक; १ जखमी

खामगाव : येथून जवळ असलेल्या माथनी फाट्याजवळ एका कारने कंटेनरला धडक दिली असून त्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चिखली रोड वरील माथनी फाट्या जवळ कंटेनर क्र. एम पी-०९-एच एच-३७७५ चा ड्रायव्हर रोडच्या साईटने कंटेनर लावत असताना नविनच असलेली कार येऊन त्या कंटेनर वर जोरदार धडकले. यामध्ये कार चालक किशोर हजारे वय 48 याच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. हजारे हे उन्द्री जवळ असलेल्या एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते येथील सुटाळा मध्ये भाड्याने रूम करून राहत होते. एक महिन्या पहिले त्यांनी कार नवीन घेतली होती व दोन दिवसांपूर्वीच त्याची पासिंग सुद्धा करून आणली होती. उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की कार चालवणाऱ्या चालकाने मद्यप्राशन केले होते व गाडी सुद्धा वेगात चालवत होता. जखमी कार चालक हजारे यांना गावातील लोकांनी तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.

Related posts

रागाच्या भरात दारुड्या पतीने केली पत्नीची हत्या

nirbhid swarajya

लॉकडाऊन मध्ये नियम न पाळणार्‍यावर पोलीस प्रशासनाची कारवाई

nirbhid swarajya

सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतून एसटी वाहकाच्या पत्नीचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान

nirbhid swarajya
error: Content is protected !!