December 21, 2024
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

चाकूचा धाक दाखवून पैसे लुटले;आरोपीला अटक

खामगांव : राजस्थान येथून लहान मुलांचे खेळणे विकण्याकरीता आलेल्या एका मजूराला अज्ञात इसमाने चाकुचा धाक दाखवून जबरीने १७५०० /-रू चोरून नेल्याची घटना नांदुरा रोड वर घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार नांदुरा रोड वर गेल्या काही दिवसांपासून राजस्थान येथून काही लोक खेळणी विकण्याकरीता आलेले आहेत. यातील सीताराम मुंग्या हे १९ जुलै रोजी नांदुरा रोड वरील राजनकर कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या बैंक ऑफ बड़ोदाच्या एटीएम मधे पैसे काढायला गेले असता तेथे एक अनोळखी व्यक्ति आला व कॉलर पकडून हफ्ता दे असे म्हणत चाकु पोटाला लावला. व त्यांच्या जवळ असलेले १७५०० रु ज़बरदस्तीने पैसे हिसकाऊन गाडीवर बसून पसार झाला. तात्काळ त्यांनी याबातची तक्रार पोलीस स्टेशन मधे दिली. पोलिसांनी तक्राराची दखल घेत सी. सी. टी. व्ही च्या मदतीने व गुन्हयात वापरलेल्या दुचाकी वाहनाच्या नंबर वरून सदरचा आरोपी मोहम्मद दानीश शेख अकील, वय २२ रा.रोहीनखेड, ता. मोताळा, जि. बुलडाणा असल्याचे निष्पन्न करून आरोपी कडून गुन्हयात वापरलेले दुचाकी वाहन, चाकू जप्त करून आरोपीस अटक केली आहे.

या आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने खामगांव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदा इत्यादी ठिकाणी बॅकेत येणारे वयोऋध्द महीला, पुरुष यांना डिपोझीट फार्म लिहून देतो, पैसेमोजून देतो अशे बाहाने करून हाथचालाखी करून फसवणूक करत असल्याचे सांगितले आहे. या चौकशी दरम्यान सदर आरोपी कडून अजून २ गुन्हे उघडकीस आले आहे. तसेच सदर आरोपीवर मोबाईल वरून फोन कॉल करायचा आहे असे सांगून मोबाईल चोरून नेण्याचे सवय सुद्धा आहे. सदर आरोपीवर औरंगाबाद, बुलडाणा जिल्हयात विविध गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी आपली चक्रे फिरवून आरोपीला २४ तासात आरोपीला अटक केली आहे. सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, खामगांव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी,खामगांव यांचे आदेशान्वये सुनिल अंबुलकर, पोलीस निरीक्षक खामगांव शहर, डि.बी.पथक प्रमुख पोउपनी गोरव सराग, पोहेकॉ गजानन बोरसे, नापोकॉ सुरज राठोड, पोकॉ दिपक राठोड, पोकॉ प्रफुल टेकाळे, पोकॉ जितेश हिवाळे, पोकॉ अमरदिपसिंह ठाकुर, पोकॉ अनंत डुकरे यांनी केली आहे. पोलिसांनी सदर आरोपींविरुद्ध अप नं. ६४४/२०२१ कलम ३९२ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Related posts

शहरात स्वच्छतेचा उडाला बोजवारा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

nirbhid swarajya

विकास कामावर खर्च केले मिळालेले कमिशन, जलंब सरपंच पती च्या वक्तव्याने खळबळ…

nirbhid swarajya

लॉकडाऊनमध्ये रांगोळीच्या माध्यमातून कोरोना विषाणूपासून बचावाबाबत जनजागृती

nirbhid swarajya
error: Content is protected !!