December 29, 2024
बातम्या

चांडक यांच्या धान्य गोडाऊन वर पोलिसांचा दुसऱ्यांदा छापा

तांदुळाच्या ४७७ पोत्या सह ट्रक केला जप्त 


खामगाव – कोरोना या आजाराने संपूर्ण देशात थैमान घातले आहे ते रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. तसेच या परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी सर्व गरीब जनतेला गहू-तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे परंतु काही स्वस्त धान्य दुकानदार काळाबाजार करताना दिसून येत आहे. शहराजवळील वाडी येथील एका धान्य गोडाऊन वरून तांदूळ ट्रकमध्ये भरून दुसऱ्या ठिकाणी विक्रीसाठी नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकला पकडून पोलीस व पुरवठा विभागाने ट्रकसह गोडावून मधील धान्य जप्त केल्याची घटना समोर आली आहे.


मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अप्पर पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत यांनी शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुनील अंबुलकर यांना माहिती दिली. अंबुलकर यांच्या आदेशाने शहर पोलीस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक गौरव सराग व पोलिस कर्मचाऱ्यांनी चांडक यांच्या वाडी येथील गोडाऊन वर धाड टाकली. तेथे त्यांना गुजरात पासिंग असलेल्या ट्रक व तांदुळाचे पोते आढळून आले. यावेळी त्यांनी खामगाव चे तहसिलदार शितलकुमार रसाळ यांना माहीत दिली असता त्यांनी पुरवठा विभागाचे भगत व वणमाने यांना घटना स्थळावर पाठवले होते.त्यांनी संपूर्ण मालाची पाहणी केली व मालाचे नमुने घेतले आणि गोडाऊन सील करून ट्रक शहर पोलिस स्टेशनला लावण्यात आला होता. या कारवाई मध्ये ट्रकमधील १५८ पोते तांदूळ आणि गोडाऊन मधील ३१९ एकूण ४७७ पोते तांदूळ जप्त केला आहे. हा माल राशन चा की प्रायव्हेट हे अद्याप समजले नाही.

याबाबत तहसिलदार यांना विचारणा केली असता  चांडक यांचे बयान घेण्यात आले आहे व हा तांदूळ तपासणी साठी नमुने पाठविण्यात आले आहेत. नमुन्यांच्या अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार शितलकुमार रसाळ यांनी दिली.

Related posts

लॉकडाऊन मधे २० नागरिकांची वरखेड येथून सुटका

nirbhid swarajya

खामगाव चिंतामणी बाल शिवभक्तचे कावळ यात्रेचे आयोजन….

nirbhid swarajya

पती पत्नीच्या वादातून पती चढला तीनशे फूट उंच टॉवरवर…

nirbhid swarajya
error: Content is protected !!