January 4, 2025
आरोग्य जिल्हा बातम्या बुलडाणा शेगांव

चाँद दिसला; ‘रमजान’चे उपवास सुरू

खामगांव : देशभरात अनेक ठिकाणी चंद्रदर्शन झाल्यामुळे उद्यापासून ‘रमजान’ हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना सुरू होत आहे. आज मंगळवारी चाँद दिसल्यामुळे मुस्लीम बांधवांचे उपवास उद्यापासून सुरु होत आहेत. विदर्भासह देशातील इतर अनेक ठिकाणी चंद्रदर्शन झाले आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यात काही भागात आकाशात ढग असल्यामुळे चंद्रदर्शन झाले नाही तरी मात्र अनेक ठिकाणावरून चंद्र पाहिल्या गेल्याचे मेसेजेस आल्याने अनेक रमजान परवाच्या सुरुवात संदर्भात मस्जिदीमधून घोषणा करण्यात आली. यांनतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. जगभरातील मुस्लीम बांधवांसाठी रमजान हा सर्वात पवित्र महिना आहे. रमजान हा इस्लामी दिनदर्शिकेतील नववा महिना आहे. ही दिनदर्शिका चंद्राच्या कलांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. जेव्हा हजरत मुहम्मद पैगंबर मक्केहून मदिनेला गेले, तेव्हा पासून म्हणजेच इसवी सन पूर्व ६२२ मध्ये हिजरी दिनदर्शिकेची सुरुवात झाली. त्यानुसार आज चंद्रदर्शन झाल्याच्या आधारे रमजान १३ एप्रिलच्या संध्याकाळपासूनच सुरू होतोय. याचाच अर्थ मुस्लीम बांधव १४ एप्रिलच्या सकाळपासून आपले रोजे पकडायला सुरूवात करतील. मात्र रमजान पर्वावरही कोरोनाचे सावट कायम असून पुढील ३० दिवस हे रोजे राहणार असून त्या नंतर रमजान ईद ने या पर्वाची समाप्ती होणार आहे.असे हाफिज आरिफ यांनी सांगितले आहे.

Related posts

In Kogonada’s ‘Columbus Modern Architecture

admin

भुसावळ विभागात क्यूआर कोड द्वारे कॉन्टॅक्टलेस तिकिट तपासणी

nirbhid swarajya

कोरोनाचा वाढत प्रदूर्भाव लक्षात घेता या वर्षीचीही यात्रा रद्द…

nirbhid swarajya
error: Content is protected !!