खामगांव : येथील टीचर्स कॉलनी भागात राहणाऱ्या पोलिसाच्या घरिच चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघड़किस आली.
मिळालेल्या माहितीनुसार येथील खामगांव ग्रामीण मधे असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख रब्बानी शेख जिलानी टीचर्स कॉलनी भागात परिवारासह राहतात. 20 सप्टेंबर रोजी त्यांच्या पुतणी चा साखरपुडा असल्याने ते आपल्या कुटुंबासह 19 सप्टेंबर ला सायंकाळी घराला कुलुप लावुन आपल्या गावी जळगांव जामोद गेलो होते. आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी 10 वा.घरी आले असता त्यांना घराचे चॅनल गेटचे लॉक तोडलेले दिसले.ते स्वतः आत घरात गेले असता आतील किचन व बेड रुमचे दरवाज्याचे लाँक तुटलेले दिसले.
आतील तिन्ही आलमारीचे लाँक तोडुन आत मध्ये ठेवलेले नगदी 49,000/- रुपये व 7500/- रु. सोन्याची नाकातील नथ पाच नग वजन अंदाजे 3 ग्राम, 7000/-रु. चांदीचे दागीने,चांदीची अंगठी तीन नग,चैनपटटी २ नग,बिचवे दोन नग व चील्लर चांदी अशी एकुण 100 ग्राम चांदी) असे एकुण सोन्या चांदीचे दागीने व नगदी मिळुन 63,500/- रु. चा माल चोरीस गेल्याचे दिसले. तसेच त्यांच्या घराबाजुला राहत असलेले अजमत उल्ला खान खलील उल्ला खान त्यांचेही बंद घरातुन 4 ग्राम सोन्याची बाळी किं. अंदाजे 10,000/- रु. व चांदी अंदाजे 1000/- रु. असा मुद्येमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराचे व अलमारीचे लॉक तोडुन चोरुन नेला आहे. शेख रब्बानी यांनी दिलेल्या फिर्यादिवारून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 457,380,454 भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.