October 6, 2025
गुन्हेगारी चिखली जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र

चक्क पतीनेच लावले पत्नीचे सार्वजनिक ठिकाणी पोस्टर

गरज पडल्यास संपर्क साधण्याचे फोटोसह लिहिला मोबाइल नंबर

पोलिसांनी केला पतीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल

बुलडाणा : विकृती किती खालच्या पातळीवर माणसाला नेऊ शकते याचे धक्कादायक व संतापजनक उदाहरण बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे समोर आले आहे. चक्क स्वतःच्या बायकोचे फोटो सार्वजनिक ठिकाणी पतिने लावून गरज पडल्यास संपर्क साधण्याचे पोष्टर लावल्याचा प्रकार समोर आले आहे.बायकोने घटस्फोट द्यावा, म्हणुन पतीने हे कृत्य केले असुन बायकोच्या बहिणीचे आणि आईचेही फोटो ही लावुन बदनामी करेन ,अशी धमकीही सासरच्या मंडळीला दिली आहे.समाधान रामदास निकाळजे असे या विकृत पतीचे नाव असुन ,तो निमगाव गुरु, ता. देऊळगाव राजा येथे राहतो. यासंदर्भात विवाहितेच्या भावाने अंढेरा पोलीसांत तक्रार दिली असून अंढेरा पोलिसांनी याप्रकरणी केवळ अदाखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. समाधान याचा विवाह अंचरवाडी येथील एका मुलीशी मागील वर्षी ३० जुन रोजी झाला होता.मात्र त्याच्या पत्नीवर संशयावरून तो बायकोला सतत शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. त्यामुळे त्याची पत्नी ही दिवाळी पासुन माहेरीच राहत आहे. दरम्यान घटस्फोट मिळावा यासाठी समाधान निकाळजे याने विकृती युक्ती योजली व स्वतःच्या बायकोचे फोटो टाकून पोस्टर बनवून सार्वजनिक ठिकाणी लावले. त्यावर गरज पडल्यास संपर्क साधावा असे म्हणुन काही मोबाईल नंबर दिले आहेत. याबद्दल विवाहितेच्या भावाने त्याला जाब विचारला असता जोपर्यंत घटस्फोट मिळत नाही तोपर्यंत एसटी, बस ,रेल्वे स्टेशन, सगळीकडे फोटो लावुन बदनामी करण्याची धमकी दिली.तर बायकोच्या बहिणीचे सह आईचे आणि आजीचे ही असेच फोटो लावुन बदनामी करीन,अशा धमक्या दिल्या.एव्हढे मोठं गंभीर प्रकरण असताना अंढेरा पोलिसानी मात्र कलम ५०७ नुसार अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे, हे विषेश.

Related posts

आठ वर्षीय चिमुकली.. कोरोनावर भारी…!

nirbhid swarajya

मुलीला पळवून नेल्याच्या कारणावरुन मारहाण युवकाचा मृत्यू ; खूनाचा गुन्हा दाखल

nirbhid swarajya

अवैध अग्निशस्त्र विक्री करणारा अटकेत ; 5 पिस्टल जप्त

nirbhid swarajya
error: Content is protected !!