January 4, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय शेतकरी

घारोड गावातील वादग्रस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित

१० वर्षापासून वंचित असणाऱ्या रेशन कार्डधारकांना मिळणार धान्य

किसान आघाडी सह नागरिकांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

खामगाव : घारोड गावांमधील भ्रष्टाचार प्रकरणी वादग्रस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला असून १० वर्षापासून वंचित असणाऱ्या रेशन कार्डधारकांना मिळणार धान्य उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन तहसीलदार यांच्याकडून मिळाल्याने नागरिकांनी आपले आंदोलन पुढील कालावधीकरिता स्थगीत ठेवले आहे सदर सदर प्रकरणी खामगाव तहसीलदारांनी हि कारवाई काल केली आहे. सदर धान्य घोटाळाप्रकरणी किसान आघाडी सह नागरिकांनी दिला होता. तालुक्यातील घारोड येथील अनेक नागरीक सन २०१२ पासुन ते २०१८ ते ०२१ पर्यंत अश्या ९ ते १० वर्षापासून शिधापत्रिका असूनही धान्यापासून वंचित राहत होते.

वारंवार तहसील कार्यालयाकडे तक्रार केल्या मात्र त्याचा फारसा ऊपयोग झाला नाही. यामध्ये मागील वर्षीच्या टाळेबंदी तसेच यावर्षीच्या टाळेबंदीत प्रत्येक शिधापत्रीका धारकांना धान्य उपलब्ध करून द्यावे असा शासनाचा आदेश असताना सुद्धा स्वस्त धान्य दुकानांमधून नागरिकांना धान्य न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली होती. शिधापत्रिका सुरूच होत नसल्याने अखेर कंटाळून जाऊन नागरिकांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह जिल्हाधिकारी ,जिल्हा पुरवठा अधिकारी ,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, यांच्याकडे तक्रारी प्रकरणी घारोड गावाला मिळणारा धान्य पुरवठा व त्यामुळे संशयास्पद असल्यानेसर्वात मोठा धान्य घोटाळा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर सदर प्रकरणी कारवाई होत नसल्याने दिनांक ५ जुलै रोजी ५० नागरिकांनी कुटुंबासह ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजाननराव बापू देशमुख यांनीही सदर धान्य घोटाळ्याची चौकशी न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.

त्यामुळे सदरचे धान्याच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आल्याने प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा चांगल्या प्रकारे उचलून धरल्याने सदर प्रकरणी तहसीलदारांनी कारवाई केली आहे. घारोड येथील स्वस्त धान्य दुकानाचा एम एम थेटे यांचा परवाना निलंबित करून सदरचे दुकान हे निरोड येथील स्वस्त धान्य दुकान बीबी लांडे यांना जोडले आहे. सदर परवाना निलंबित राहणार असून गावांमध्ये जे शिधापत्रिकाधारक नागरिक स्वस्त धान्यापासुन वंचित राहात आहेत त्यांना लवकर धान्यपुरवठा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र उपोषणकर्ते व आंदोलन करणाऱ्या किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांना हि तहसीलदार यांनी लेखी पत्र देण्यात आल्याने नागरिकांनी आपले उपोषण काही कालावधी करता स्थगित केल्याचे तहसील कार्यालयाला सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या सतर्कतेने मोठा धान्य घोटाळा समोर येणार असून सदर प्रकरणात निपक्ष चोकशी अधिकारी नियुक्त करून या धान्य घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या दोषी असलेल्या सर्वावर करवाई करावी अशी अपेक्षा नागरिकाकडून व्यक्त होत आहे.

Related posts

जिल्ह्यात आजप्राप्त 165 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 29 पॉझिटिव्ह 71 रूग्णांची

nirbhid swarajya

रा.यु.काँग्रेस वतीने गांधीजींच्या पुतळ्या समोर “अग्निपथ”योजनेच्या विरोधात निषेध आंदोलन….

nirbhid swarajya

माजी आमदार सानंदा यांच्या प्रयत्नामुळे अडकलेल्या ५१ कामगारांची घरवापसी

nirbhid swarajya
error: Content is protected !!