खामगाव तालुक्यातील युवकांचा जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांच्या उपस्थितीत ‘स्वाभिमानी’त प्रवेश..
खामगाव: अलीकडे ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा जिल्ह्यातील तरुणांचा ‘स्वाभिमानी’कडे मोठ्या प्रमाणात ओढा वाढत आहे.तसेच आज घाटाखालील खामगाव येथील विश्राम गृह येथे स्वाभिमानी चे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खामगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील युवकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे व विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गुणवंत सुरडकर,प्रतिक चव्हाण,अनिल रकताडे,अभी सोनार,प्रेम भारसाकळे,आकाश कळमकार,रुषी उगले,प्रशांत हरमकार,जय ओतारी,गौरव देसले, पकंज डंवगे,राम डाबेराव या युवकांनी श्याम अवथळे व निलेश देशमुख यांच्या हस्ते स्वाभिमानी चा बिल्ला लावून प्रवेश केला. या वेळेस श्याम अवथळे यांनी या सर्व तरुणांना मार्गदर्शन करत ‘स्वाभिमानी’ या नंतर विद्यार्थी यांच्या प्रश्नावर आता ताकतीने लढणार आणि विद्यार्थांना न्याय मिळवून देणार येणाऱ्या काळात विध्यार्थी यांच्या प्रश्नावर खूप मोठे आंदोलन उभे करणार आहे असे बोलत या सर्व युवकांचे “स्वाभिमानी” परिवारात स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख,तालुका प्रसिद्धी प्रमुख निलेश गवळी शुभम गावंडे या कार्यकर्त्या समवेत इतर पदाधिकारी उपस्थित होते.