खामगाव : येथून जवळ असलेल्या घाटपुरी गावा जवळ ट्रॅव्हल्स पलटी झाल्याची घटना रात्री 3 वाजताच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार झारखंड येथून मजुरी करणाऱ्या लोकांना मुंबई येथे घेऊन जात असलेली ट्रॅव्हल्स क्रमांक WB-37-D-3730 सकाळी घाटपुरी गावानजीक पलटी झाल्याची झाली.ड्रायव्हरला झोप लागल्याने ट्रॅव्हल्स पलटी झाल्याची माहिती ट्रॅव्हल्स मध्ये बसलेल्या प्रवाशांना दिली आहे. ट्रॅव्हल्स पलटी होताच ड्रायव्हर व क्लिनर घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
ट्रॅव्हल्स मधील ६० प्रवाशांपैकी सदर घटनेमध्ये मो.नसीम अन्सारी वय ३५ रा. कदमागाव जिल्ह्या बका व फिरोज अन्सारी वय २८ रा. हलगाव काजीपुरा बिहार हे दोन जण किरकोळ जखमी झाले असून बाकी ५८ प्रवासी सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले होते. गावकऱ्यांच्या मदतीने ट्रॅव्हल्स मधील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले असून घाटपुरी गावात राहणारे संतोष कुलकर्णी व बलदेवसिंग गांधी यांनी त्या सर्व प्रवाशांची जेवणाची व्यवस्था केली आहे वृत्त लिहेपर्यंत पुढील कारवाई सुरू होती.