खामगांव : तालुक्यातील टेंभुर्णा येथील शेतकऱ्याच्या घरासमोरून २ बकऱ्यासह ३ लहान पिल्ले चोरी गेल्याची घटना घडली आहे.खामगांव तालुक्यातील टेंभुर्णा येथील शेतकरी अरुण वासुदेव काळणे वय ५३ यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी मधे सांगितले आहे की, ५ डिसेंबर रोजी रात्री त्यांच्या घरासमोर २ बकऱ्यांसह ३ लहान पिल्ले दावनिला बांधुन ठेवले होते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ते बकऱ्या सोडण्याकरीता घराबाहेर आले असता यांच्या बकऱ्या दिसून आल्या नाही त्यामुळे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी यांच्या बकऱ्या एकुण किं ३० हजार रु चोरुन नेल्या. तर याप्रकरणी अरुण वासुदेव काळणे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन मधे दिलेल्या फिर्यादि वरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोहेकॉ मनोज चव्हाण करीत आहेत.
previous post
next post