खामगांव : काही दिवसांपूर्वी डॉ. दर्शन अशोक वाठ यांचे बंद घराचे कुलुप आरोपींनी दिनांक ३० सप्टेंबर रोजी रात्री ते १ ऑक्टोंबर दुपार दरम्यान कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून कपाटाचे लॉक तोडून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी १० हजार रुपये असा एकूण 54 हजारात चोरून नेल्याची फिर्याद सचिन महादेव तांडव यांनी पोलीस स्टेशनला दिली होती. पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशान्वये डीबी प्रमुख गौरव सराग व सर्व कर्मचारी हे खामगाव शहर हद्दीत गस्त घालत असताना लॉयन्स स्कूलच्या समोरील खुल्या पटांगणात गजानन रावळकर वय 21, शिवम उर्फ शुभम ससाने वय 22, अनिकेत देशमुख वय 20 हे तिघे व पवन दामोदर हे संशयितरित्या फिरताना दिसून आले. पोलिसांना त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता पहिले त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच खामगाव शहरातील केलेल्या चोरीची कबुली दिली व त्याचे इतर साथीदार यांनी डॉ. गायकवाड हॉस्पिटल मागे बंद घरी चोरी चोरी केली असल्याची कबुली दिली. आरोपीच्या माहितीवरून त्याचा साथीदार चेतन राजेश ठाकूर वय 19 रा. खामगाव याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्या सर्व आरोपींकडून चोरी गेलेला मुद्देमाल सोन्याचे कानातले १ जोड ,चांदीचा ग्लास १ नग, १ नग चांदीची अत्तरदानी, चांदीची लहान मुलांचा कंबरेचा करदोडा १नग, गणपतीची व लक्ष्मीची मूर्ती चांदीचे १० ग्रॅमचे ५ नग,दोन मोबाईल असा एकूण ५१३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून इतर मुद्देमालाचा शोध तसेच इतर आरोपींच्या साथीदारांचा शोध घेणे सुरू आहे.खामगाव शहरात बऱ्याच ठिकाणी चोरी केल्याचा पोलिसांना त्यांच्यावरच संशय आहे. सदर कारवाई अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये व हेमराजसिंह राजपूत अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सूनील अंबुळकर पोलीस उपनिरीक्षक गौरव सराग,गजानन बोरसे राजेंद्र टेकाळे ,संदीप टाकसाळ ,सुरज राठोड, नवाज शेख, दीपक राठोड ,प्रफुल्ल टेकाळे, अरविंद बडगे, संतोष वाघ यांनी केली आहे.