खामगाव:- ना.नितीन राऊत यांनी नुकत्याच खामगाव मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात श्रध्येय बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसा बाबत वक्तव्य केले आहे.आंबेडकर कटुंब नेहमी शाहु, फुले,आंबेडकरांच्या विचाराचे पाईक असुन कोणाचा वारस काढणे हे या पुरोगामी महाराष्ट्राला अभिप्रेत नाही.मा. प्रकाश आंबेडकर कोणत्याही पक्षाचे असोत,पण सर्वप्रथम ते महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत.जसा छत्रपतींच्या वंशजाचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही तसेच श्रध्येय बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजाचा अपमान सुध्दा सहन केला जाणार नाही.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस खामगाव सोशल मीडिया प्रमुख दिलिप पाटील यांनी दिली आहे
previous post
next post