रेड झोन मधे लॉकडाऊन वाढविणार
खामगांव : कोविड १९ या आजारा सोबत संपूर्ण राज्यमध्ये आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि विविध विभागाचे अधिकारी लढा देत आहे ही समाधानाची बाब आहे. खामगावातही चांगल्या प्रकारे लढा दिल्या जात आहे असेच सहकार्य सर्वांनी द्यावे. हि लढाई माहीत जिंकणार आहोत असा विश्वास राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांनी यांनी व्यक्त केले. बुलडाणा जिल्ह्यातील खामगावात आज मंगळवारी ते धावत्या दौऱ्यावर असतांना पत्रकारांशी ते बोलत होते.
३ मे नंतर लॉकडाऊन थांबणार का ? असा प्रश्न निर्भीड स्वराज्यच्या प्रतिनिधींनी केला असता ग्रीन झोन मधील गावांना ३ मे नंतर मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात येणार आहे मात्र रेड झोन मधील लॉकडाऊन वाढविल्या जाणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.