January 1, 2025
गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र सिंदखेड राजा

ग्रा.पं. कर्मचाऱ्याचा वीज खांबावर शॉक लागून मृत्यु

लाइनमनने ग्रा.पं. कर्मचाऱ्याला वीज खांबावर चढवले अचानक वीज पुरवठा सुरू होऊन जागीच कर्मचारी चिटकला!;

दोषी लाइनमन वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

सिंदखेड राजा : शेेेतातील मुुख्य वीज वाहिनीच्‍या खांबावर चढून दुरुस्‍तीचे काम करताना अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने शॉक लागून ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांची दुर्दैवी मृत्यू झाल्‍याची धक्‍कादायक घटना मलकापूर पांग्रा येथे आज सकाळी दहाच्‍या सुमारास साखरखेर्डा रस्त्यावरील कायंदे यांच्या डीपी जवळील शेतात घडली. यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्या सोबत लाइनमनही होता, पण तो घटनेनंतर फरार झाला. घटनेची माहिती गावात कळताच गावकरी मोठ्या संख्येने घटनास्‍थळी जमले होते. जोपर्यंत कर्मचाऱ्याच्‍या नातेवाइकांना महावितरणकडून अर्थसाह्य आणि लाइनमनविरोधात गुन्‍हा दाखल होते नाही तोपर्यंत मृतदेह खाली उतरवू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. या घटनेची दखल घेत साखरखेर्डा पोलीस स्टेशन चे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी लाइनमनविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. घटनेनंतर तीन तासांनी खांबावरून मृतदेह खाली उतरून नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या दुर्दैवी घटना बाबत माहिती अशी की मलकापूर पांग्रा येथील विश्वंभर श्रावण मांजरे वय ५० हे ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा कर्मचारी असून वीज दुरुस्ती ते कामे करतात विश्वंभर मांजरे यांना गावात सर्वजण डाक्टर म्हणून ओळखतात आज सकाळी दहा वाजेच्या दरम्यान लाईन वर बिघाड झाला आहे ती दुरुस्ती करायची आहे म्हणून लाईनमन प्रशांत देशमुख यांनी विश्वंभर मांजरे यांना लाईन दुरुस्तीच्या कामासाठी नेले लाईनमनला खांबावर चढता येत नसल्याने त्यांनी डाक्टरला खांबावर चढवले त्यासाठी लाईन बंद करण्याचा सबस्टेशन मधून परवाना घेतला मात्र अचानकच वीज पुरवठा सुरू झाल्याने विशंभर मांजरे हे विजेच्या ताराला चिटकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. विश्वंभर मांजरे खांबावर चिटकला हे बघून घटनास्थळावरून लाईनमन प्रशांत देशमुख आणि त्यांचा सहाय्यक मोटर सायकलवर बसून तिथून पळ काढला. गावकऱ्यांनी माहिती मिळताच लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार जितेंद्र आडोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही घटनास्‍थळी धाव घेतली. मात्र मृतदेह खाली उतरवण्यास ग्रामस्‍थांनी विरोध सुरू केला. यावेळी भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विनोद भाऊ वाघ यांनी घटनास्थळी घेऊन तात्काळ वीज वितरण कंपनी वर गुन्हा दाखल करा आणि त्याला आर्थिक मदत करा अशी मागणी केली त्यासाठी रस्त्यावर एक तासभर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सरपंच भगवान उगले माजी सरपंच अहमद यारखा पठाण ,गुलशेर खासाब, बंडू उगले, राजू साळवे यांच्यासह गावकऱ्यांनी तात्काळ गुन्हे दाखल करा अशी मागणी केली. तर मृतकाच्या नातेवाईकांसह लाईनमनला आमच्यासमोर हजर करा अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली यावेळी घटनास्थळी प्रचंड गर्दी होत असल्याने ठाणेदार आडोळे यांनी पोलिसांचा फौजफाटा मागविला यावेळी साखरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक राणे बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार लहू तावरे यांचेसहअतिरिक्त पोलिसांची फौज मागण्यात आली. घटनेनंतर तीन तासाने महावितरण कंपनीचे अभियंता ए एम खान यांनी घटनास्थळी येऊन संबंधित दोषी लाईनमन विरुद्ध तात्काळ निलंबन करू आणि मृतकाच्या नातेवाईकांना मदत करू असे ठोस आश्वासन दिल्याने पोलिसांच्या मदतीने मृतदेह खाली उतरण्याचा आला. त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यारावर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि ठाणेदार आडोळे यांना कारवाई करण्याबाबत सूचना केल्या. सदर लाईनमन प्रशांत देशमुख याच्या विरोधात मृतकाचा भाऊ नंदू मांजरे यांनी तक्रार दिल्यान लाइनमनविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्‍हा दाखल केला. दुपारनंतर मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी बीबी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. गावातील प्रामाणिक आणि मनमिळावू स्वभावाच्या डॉक्टर अचानक गेल्याने अख्खा गाव हळहळला प्रत्येक समाजातील महिलांनी जणूकाही आपल्या घरातील व्यक्ती गेली अशी भावना व्यक्त करत आहे.

Related posts

12 ऑगस्टला ‘वंचित’कडून डफली बजाव आंदोलन

nirbhid swarajya

अग्रवाल हॉस्पिटल येथे मोफत अस्थिरोग शिबीर व हाडाच्या ठिसूळपणाची तपासणी

nirbhid swarajya

लॉकडाऊनला न जुमानता जनतेने सामान्य जिवनास प्रारंभ करावा – प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने

nirbhid swarajya
error: Content is protected !!