खामगाव : खामगांव तालुका सरपंच संघटनेने महाराष्ट्र मध्ये मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणुन विद्यमान सरपंच यांचीच नेमणुक करावी व काही राजकीय पक्षा कडुन होणारा घोडे बाजार थांबवावा अशी मागणी करत खामगाव येथील पंचायत समिती येथे आंदोलन करीत नारेबाजी केली यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.
कोरोना महामारी च्या प्रसंगी प्रत्यक गावाने विद्यमान सरपंच यांच्या च नेतृत्वा खाली यशस्वी लढा दिला आहे, त्याच बरोबर अनेक विकास कामे चालु आहेत जर काही पक्षा कडुन घोडेबाजार च्या आधारावर जर प्रशासक यांच्या नेमणुका जर झाल्या तर विकास कामाना खिळ बसेल व गावाची राजकीय सामाजिक घडी विस्कटेल व गावातील वातावरण कलुषित होईल त्या मुळे विद्यमान सरपंच यांना च प्रशासक म्हणुन नेमले पाहिजे, राजकिय अस्थिरता निर्माण झाल्यास पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना काळजीवाहु म्हणुन काम पाहण्यास सांगीतले जाते त्या प्रमाणे ग्रामपंचायत बाबत निर्णय घ्यावा अशी मागणी खामगांव सरपंच संघटनेने केली आहे.
next post