खामगांव : कोरोनाच्या ओढावलेल्या संकटामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.त्यामुळे इतर व्यवसाय सोबत कोरोनाचा प्रसार न होण्याच्या दृष्टीने शाळा-कॉलेज ही शासनस्तरावरून बंद करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पण आता तूर्तास तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून काही शाळा-कॉलेजेस,औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू झाल्या आहेत. तर शासनाच्या सूचनेनुसार काही शाळा लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे.या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातील शालेय व सामान्य बसेस त्वरित सुरू कराव्यात सततची नापिकी यामुळे ग्रामीण भागात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.याचा विचार करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी बस पासेस देण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन भाजपा विद्यार्थी आघाडी खामगाव तालुक्याच्या वतीने खामगाव आगार व्यवस्थापक यांना देण्यात आली आहे.यावेळी विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन गरड तालुका अध्यक्ष राज पाटील शहराध्यक्ष शुभम देशमुख आशिष सुरेखा प्रतीक मुंडे यांच्यासह भाजपा विद्यार्थी आघाडी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
previous post