खामगाव : महिला व बालविकास क्षेत्रामध्ये चांगले काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्धेशाने ग्रामपंचायत ज्ञानगंगापूर येथे अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे आयोजन केले ज्ञानगंगापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.त्यानंतर कर्तव्य दक्ष महिलांना सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कार मूर्ती सौ शीला प्रकाश सुर्यवंशी,सौ निता सुभाष महाले,यांना ग्रामपंचायत सदस्य सौ योगिता महाले व सुनंदाबाई महाले यांच्या हस्ते सत्कार करून सम्मानीत करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच ज्ञानेश्वर महाले होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका नलिनी महाले यांनी केले याप्रसंगी ज्ञानगंगापूर ग्रामपंचायत सचिव ज्ञानेश्वर अंभोरे तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रीतम महाले,योगिता योगेश महाले, द्रोपदाबाई रायभान पैठणकर,सुनंदा बाई भागवत महाले व योगेश महाले,शैलेश पैठणकर,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.