January 6, 2025
खामगाव

गोरगरिबांच्या अन्नासाठी भाजपा आमदार फुंडकर यांचा रुद्रावतार

आमच्यावर गुन्हे दाखल पण गरिबांना जेवण द्या

खामगांव : लॉकडाऊन मुळे संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये गोरगरिबांवर उपासमारीची पाळी आलेली असताना खामगाव शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीने गरजू कुटुंबीयांसाठी घरपोच जेवणाच्या पाकिटांची व्यवस्था केली होती. मात्र एका तक्रारीनंतर शासनाने सदर जेवण व्यवस्था बंद केल्याने आज शनिवारी गोरगरीब महिलांनी उपविभागीय कार्यालय समोर जमा होऊन आम्हाला जेवण द्या अशी मागणी केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लॉकडाऊन असल्याने महिलांना घरी जाण्याचे सांगितले ही बाब या भागाचे भाजपा आमदार अँड आकाश फुंडकर यांना समजल्याने त्यांनी तेथे पोहचून महिलांना घरी पाठवणाऱ्या पोलिसांवर चांगलाच रोष व्यक्त केला. तर खुशाल आमच्यावर गुन्हे दाखल करा असे सांगितल्याने यावेळी एकच खळबळ उडाली होती यावेळी आमदार फुंडकर यांच्या रुद्र अवतार पाहायला मिळाला.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये खामगाव शहरातील गोरगरीब जनतेसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेमध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याची तक्रार काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने केल्याने या तक्रारीच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधकांनी खामगाव बाजार समितीला सदर जेवण वितरण प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश दिल्याने शहरातील गोरगरीब व हात मजुरांच्या कुटुंबीय वर उपासमारीची पाळी आलेली आहे यामध्ये आज शनिवारी शहरातील ४० ते ५० महिला उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या कार्यालयासमोर गोळा होऊन आम्हाला दोन वेळचे जेवण द्या यासाठी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असतानाच पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलांना घरी जाण्याच्या सूचना केल्या ही बाब खामगाव विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार अँड आकाश फुंडकर यांच्या कानावर पडतात त्यांनी घटनास्थळ गाठून महिलांना घरी पाठवणाऱ्या पोलिसांची चांगलीच कानउघडणी केली. काँग्रेसचे पदाधिकारी सोशल डिस्टन्ससिंगचा उल्लंघन करीत असताना त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाही आणि ज्या महिला दोन वेळच्या जेवणासाठी दोन तासापासून येथे बसलेले आहेत त्यांना मात्र पोलिस कारवाईच्या धमक्या देत आहे असा रोष व्यक्त करीत काय करायचे ते खुशाल करा आमच्यावर गुन्हे दाखल करा असे पोलिसांना सांगितल्याने एकच खळबळ उडाली यावेळी उपाशी महिलांना धीर देत आमदार अँड फुंडकर यांनी आपल्या जेवणाची व्यवस्था मी करतो असे सांगितले व गोरगरिबांच्या जेवनासाठी आमदारांनी रुद्रावतार धारण केल्याचे दिसून आले.

Related posts

बोरजवळा ग्रामसेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मधुकर तोमर

nirbhid swarajya

गुंजकर कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा सलग चौथ्या वर्षी १०० टक्के निकाल

nirbhid swarajya

हटकर गरबा उत्सव २०२२ उत्सव मंडप भूमिपूजन शुभारंभ

nirbhid swarajya
error: Content is protected !!