खामगाव: येथे गुरांचा बाजार मोठा असल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातून काही व्यवसायिक गुरांची खरेदी-विक्री करण्यासाठी बाजारात येत असतात तर या ठिकाणाहून गेल्या काही दिवसापासून दुचाकी चोरी या घटनांमध्ये वाढ झाली आहे मात्र पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.येथील टी एम सी मार्केटमध्ये गुरुवार रोजी गुरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने या बाजारामध्ये ग्रामीण भागातील गुरांचे व्यवसायिक हे गुरे खरेदी-विक्री करिता बाजारात येत असतात तर मागील आठवड्यात पिंपळगाव राजा येथील व्यवसायिक शेख युनूस शेख अन्वर हे १९ नोव्हेंबर रोजी बाजारात गोरे खरेदी करिता आले होते तर त्यांच्या खिशातून ५० हजार रुपये चोरीत गेल्याची घटना घडली होती.
तर गोंधनापूर शेतकरी प्रल्हाद पंढरी ठोंबरे वय (३०) हे २६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास त्यांची मोटरसायकल हिरो होंडा क्र MH-२८-AA-४४३९ (किं १५ हजार) ही मार्केट च्या ऑफिस च्या बाजूला हँडल लॉक करून उभी केली होती. त्यानंतर प्रल्हाद ठोंबरे हे बाजारातून काम आटपून त्यांची मोटर सायकल उभी करून ठेवलेल्या जागी आले असता त्यांची मोटरसायकल ही त्यांना दिसली नाही त्यांनी बाजारातील परिसरात शोध घेतला मात्र अजूनही त्यांची दुचाकी मिळून आली नाही त्यामुळे कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दुचाकिचा शोध घेतला मात्र कुठेही दिसून आली नाही. तर या प्रकरणी प्रल्हाद पंढरी ठोंबरे यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो हे कॉ विनोद शेळके करीत आहेत.