खामगांव : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या व मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या गुटख्याची एका अँपेतून वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावरून शिवाजी नगर पोलिसांनी सुटाळा बु. येथील एमआयडीसी टी पॉईंटवर नाकाबंदी केली. यावेळी पोलिसांनी अॅपे क्र. एमएच-२८-एबी-०८६२ थांबवून अपेची तपासणी केली असता केसरयुक्त विमल पान मसाला ४१६ पाकिट, व्ही-१ तंबाखूचे ४१६ पाकिट असा एकूण ९० हजार २७२ रूपयांचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना शे.समीर शे.इसा (२५) रा.जमजम नगर शेगाव व इरफान खान रहीम खान (२७) रा.बर्डे
प्लॉट हे दोघे मिळून आले.
पोलिसांनी वाहनासह (किं. १लाख ५० हजार) एकूण २ लाख ४० हजार २७२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पीएसआय राहुल चव्हाण यांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपींविरूध्द भादंवि कलम १८८,२७२, २७३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास नापोकाँ शैलेश राजपूत करीत आहेत.