दहावी-बारावीसह इतरही सर्व बॉचेस ऑफलाईन सुरू
खामगाव : गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे विश्वासनिय दालन असलेल्या प्रा. रामकृष्ण गुंकजर सरांच्या गुंजकर कोचिंग क्लासेस मध्ये NEET,JEE व MH-CET क्रॉशकोर्सला 24 जून पासून प्रारंभ होत आहे. तसेच दहावी -बारावीसह इतर सर्व बॉचेसला ऑफलाईनची परवानगी मिळाली असून या बॉचेसही सुरू झाल्या आहेत. मेडिकल, इंजिनिअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असणारी NEET ,JEE व MH-CET ही पूर्व परीक्षा लवकरच होणार आहे. या अनुषंगाने मेडिकल, इंजिनिअरिंगला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुंजकर कोचिंग क्लासेस वामन नगर खामगाव येथे 24 जून पासून क्रॉशकोर्सच्या बॉचेसला प्रारंभ होणार आहे.
परीक्षेला अल्प कालावधी असल्याने चार ते साडेचार महिन्यात या परीक्षेचा संपूर्ण क्रॅशकोर्स पूर्ण करून घेतला जाणार आहे. शासनाने घालून दिलेल्या कोविड नियमांचे पालन करून व विध्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या सर्व उपाय योजना करून ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने हे क्लासेस घेण्यात येणार आहेत. तरी खामगावसह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी त्वरित गुंजकर कोचिंग क्लासेस वामन नगर खामगाव येथे संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्रा. रामकृष्ण गुंजकर सर यांनी केले आहे.
त्याच प्रमाणे ऑफलाईन कोचिंग क्लासेसला प्रशासने परवानगी दिली आहे. त्यामुळे गुंजकर कोचिंग क्लासेस येथे नियमितपणे आठवी, नववी दहावी-बारावीसह इतर सर्व बॉचेससाठी ऑफलाईन साठी प्रवेश देणे सुरू झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरू होते त्यांचे आता ऑफलाईन क्लासेस सुरू होत आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित आपला प्रवेश निश्चित करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.