खामगाव-गुणवत्तापूर्ण शिक्षणासह आवश्यक सर्व सुविधायुक्त व तसेच आधुनिक शिक्षण प्रणाली उपलब्ध असलेल्या गुंजकर जुनियर कॉलेजमध्ये नवीन शैक्षणिक सत्राकरीता ११ वी, १२ वी, बीए, बीकॉम, बीएस्सीची प्रवेश प्रकिया सुरु झाली आहे.जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात शैक्षणिक क्षेत्रात मोठे नाव मिळविलेल्या व शिक्षणाची गुणवत्ता कायम राखत विद्यार्थी व पालकांमध्ये विश्वास निर्माण करणाऱ्या गुंजकर एज्युकेश हबच्या गुंजकर कॉलेजने स्थापनेपासून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखलेली आहे. त्यामुळे या कॉलेजकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत चालला आहे. दरम्यान नवीन शैक्षणिक सत्र २०२२-२३करिता गुंजकर कॉलेज येथे अकरावी, बारावी, बीए बीकॉम, बीएस्सीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.मर्यादित जागा असल्याने विद्यार्थ्यांनी त्वरित गुंजकर कॉलेजमध्ये आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रा. रामकृष्ण गुंजकर सर यांनी अभिनंदन केले आहे.
११ वी सायन्समध्ये फिशरी,कम्प्युटर व आयटी हे विशेष उपलब्ध
गुंजकर कॉलेजमध्ये सर्व सुविधायुक्त व आधुनिक प्रणालीचे शिक्षण ऊपलब्ध करून देण्यात आले आहे. या कॉलेजने अल्पावधीत वेगळा ठसा उमटविला असून येथे ११ वी सायन्स मध्ये विद्यार्थ्यांसाठी फिशरी, कम्प्युटर व आयटी हे विषय उपलब्ध आहेत.येथे प्रशिक्षित व आप-आपल्या विषयात तज्ञ असणारे अनुभवी प्राध्यापक असून आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.