३० विद्यार्थी गुणवत्ता यादीत
खामगाव : गुणवत्तापूर्ण व विश्वासनिय शिक्षणाचे दालन म्हणून नावलौकिक मिळविलेल्या प्रा. रामकृष्ण गुंजकर सरांच्या गुंजकर कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा इयत्ता १२ वी चा सलग चौथ्या वर्षी १०० टक्के निकाल लागला आहे. कॉलेजचे तब्बल ३० विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन गुणवत्ता यादीत आले आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डच्या एचएससी १२ वी चा निकाल जाहीर झाला आहे. या मध्ये खामगाव येथील प्रसिद्ध गुंजकर कॉमर्स अँड सायन्स ज्यनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सलग चौथ्या वर्षी ठसा उमटवला आहे.परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांची उत्तीर्ण झाले आहेत.
गुंजकर कॉलेजचे ३० विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन गुणवत्ता यादीत झळकले आहेत.काल लागलेल्या निकालात कॉमर्स शाखेमधून सर्वाधिक ९७% गुण घेऊन निकिता छतवणी पहिली आली आहे तर सायन्स शाखे मधून वैभवी खंडारे ९६.८३% ,पृथ्वी पेसोडे ९६%, ,आदित्य गुंजकर ९५.८३% असे गुण मिळवत यश प्राप्त केले आहे. .या सर्वांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर सर ,सचिव प्रा. सुरेखा गुंजकर ,प्राचार्य रायबोले सर ,तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर,कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.