संभापूर : कोविड 19 विषाणू चा प्रादुर्भाव शहरांकडून आता गाव खेड्यांमध्ये देखील होतांना दिसत असल्याने या विषाणू च्या विरोधात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात देखील महिलांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. खामगाव तालुक्यातील संभापूर येथे महाराष्ट्र ग्रामीण जिवन्नोत्ती अभियान मार्फत स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शारीरिक अंतर ठेवत ग्रामसंघाच्या महिलांना ICRP तेजस्विनी पवार यांच्या कडून प्रशिक्षण देण्यात आले, ज्यामध्ये हाताची स्वच्छता, श्वास घेतांना आणि सोडताना घ्यावयाची काळजी, जोखीम प्रवण गटांची विशेष काळजी यासह लॉकडाऊन नंतर संरक्षणात्मक उपाय याविषयी प्रशिक्षण देण्यात आले, सोबतच या विषाणू संदर्भात जनजागृती करण्यात आली
यावेळी LCRP जयश्री गवारगुरु, ECRP सुजाता गवारगुरू, अंगणवाडी सेविका संगीता पवार, अंगणवाडी मदतनीस, ग्रामसंघाचे पदाधिकारी, गावातील स्वयंसहायता समूहातील महिलांसह इतर महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
previous post