खामगाव : तालुक्यातील ग्राम काळेगाव येथे झोपडपट्टी वस्तीवरील कानिफनाथ मंदिरावर जाणारा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून नागरिकांना दलदलीच्या चिखलातून प्रवास करावा लागत आहे.वेळोवेळी ग्राम पंचायतला सांगून सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल गाव पातळीवरून होत नसून नागरिक संतप्त झालेले आहेत. या रस्त्यामुळे गुरे ढोरे यांची पाय मोडणी होत आहे.शेतात जाण्यासाठी गुरांना – बैलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नागरिक या रस्त्यापासून गेल्या काही दिवसापासून त्रस्त असून सुद्धा स्थानिक पातळीवरून कुठल्याही प्रकारची दखल काळेगाव ग्रामपंचायत यांनी घेतली नाही. तर याकडे लक्ष वेधण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.