बोरी अडगाव : अडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने निगराणी समिती गठित करून गावातील नागरिकांना घरामध्ये राहण्याची विनंती करण्यात आली यावेळी निगरानी समितीच्या माध्यमातून संपूर्ण गावांमध्ये फिरून किराणा दुकानदार सामान देताना कमीत कमी तीन फुटाचे अंतर ठेवून सामान देण्यात यावे अश्या सूचना देण्यात आल्या व अवैध गावठी दारू व्यावसायिकांना सक्त ताकीद देऊन कोणी दारू विकल्यास तात्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल व कारवाई करण्यात येईल अशा सूचनासुद्धा त्यांना देण्यात आल्या.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर गावात निगराणी समितीच्या माध्यमातून कोणालाही गावामध्ये येऊ दिला जाणार नाही व कोणीही घराबाहेर फिरू नये, विनाकारण फिरत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. खामगाव तालुक्यामध्ये कोरोना चा रुग्ण आढळल्यामुळे दक्षता म्हणून या सर्व उपाययोजना गावामध्ये करण्यात येत आहेत. यावेळी अडगाव चे सरपंच ज्ञानेश्वर मेतकर पोलीस पाटील शारदा ठाकरे, बोरीचे सरपंच रंजना सुरवाडे, पोलीस पाटील रमेश सोळंके, दिलीप पाटील, ज्ञानेश्वर ठाकरे ,शिवाजी पाटील, रामेश्वर उमाळे, शिवा ठाकरे, सुदाम पाटील, सुहास पाटील, भरत सुरवाडे,निलेश सुरवाडे, मनोहर सुरवाडे, बाबाराव सुरवाडे, प्रल्हाद दुतोंडे, भीमराव सुरवाडे, निरंजन सुरवाडे ,अनंता जुमळे, शेख मुक्तार, साहेबराव सुरवाडे, विनायक बोहरपी यासह आदी नागरिक उपस्थित होते.
previous post