७८ हजारांचा मुद्देमाल केला नष्ट
बुलडाणा : कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामध्ये सर्वत्र संचारबंदी असतांना जिल्ह्यात अवैधरित्या सऱ्हास गावठी दारूची विक्री सुरु असून उत्पादन शुल्क विभागाकडून मोठ्या प्रमाणात छापे टाकून कारवाही केली जात आहे, तर याच पार्श्वभूमीवर बुलडाणा मधील भिलवाडा परिसरात छापा टाकून गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन, दारू आणि इतर ७८ हजार ३२० रुपयांचे साहित्य उत्पादन शुल्क विभागाने नष्ट केले असून पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.