बुलडाणा : वेळोवेळी आंदोलन करून निवेदने देऊन गावकऱ्यांच्या मागण्याची दखल घेतलय जात नसल्याने अखेर आज टॉवरवर चढून आणि ग्रामपंचायतीच्या इमारतीवर चढून महिला आणि पुरुषांनी शोले स्टाईल आंदोलन केलेय…बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गणेशपूर या गावात हे आंदोलन सुरु आहे.
खामगाव तालुक्यातील गणेशपुर येथील वार्ड क्रमांक 2 मधील झोपडपट्टीला ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडे वेळोवेळी तक्रारी करूनही हक्काचा रस्ता उपलब्ध करून दिला नाही. व कुठलीच तक्रार दाखल होत नसल्याने गावकऱ्यांनी बुधवारी खामगाव येथील पंचायत समिती समोर थाळी बजाओ आणि घंटा नाद आंदोलन केले. यावरही तक्रार दाखल न झाल्याने शेवटी आज गुरुवारी शंभर च्या वर महिला आणि पुरुष गावातील ग्रामपंचायत कार्यालयावर चढून आंदोलन सुरु केले आहे. तर काही युवाकांनी गावातील मोबाईल टॉवर वर चढले आहे. जो पर्यंत झोपडपट्टी वासियांना रस्ता मिळत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्यची भूमिका झोपडपट्टी वासियांनी घेतली आहे. याबाबत गाविकास अधिकारी राजपूत यांना विचारले असता झोपडपट्टीची मोजणी करुन कारवाई करु असे सांगण्यात आले.गावकर्त्यांनी जाहीर केले आंदोलन -दि. २४/०१/२०२० वार शुक्रवार ला शांततामय वातावरणात ग्रा.पं.कार्यालय गणेशपूर समोर ठिय्या आंदोलन दि. २५/०१/२०२० “स्वतंत्र भारतात आम्ही पारतंत्र्यात” असे घोषना / नारे देऊन गावांत काळे झेंडे घेऊन सायं ५ – ६.३० दरम्यान मिरवणूक काढली . दि. २६/०१/२०२० ला झोपडपट्टीत सकाळी घरांवर काळे झेंडे लावून समस्या न सोडविल्यास तिव्र निषेध करणे …