मोताळा : कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखन्यासाठी देशभरात लॉकडाऊन झालेले आहे. त्यामुळे रोजगार बंद झाला आहे व गरीब, निराधार यांना उपासमारी ची वेळ आलेली दिसून येत आहे. या संकटात त्यांना मदतीचा हात देण्यासाठी काही ठिकाणी लोक पुढे येताना दिसत आहेत. मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.
मोताळा तालुक्यातील सिंदखेडा गावात लॉकडाऊन चे परिणाम दिसून येत आहे. रोजगार बंद झाला आहे, त्यामुळे गरीब, निराधार यांना संकटाचा सामना करण्याची वेळ आलेली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सिंदखेडा सरपंच सौ. विमल अर्जुन कदम यांनी मागासवर्गीय वस्तीतील प्रत्येक कुटुंबाला व गावातील भूमिहीन शेतमजूर यांची हातमजुरी कोरोना मुळे बंद पडली त्यासाठी सरपंच यांचे कडून 7 किलो गहू व 1 किलो तेल मदत म्हणून वाटप करण्यात आले. गावातील 120 कुटुंब यांना ही मदत करण्यात आली आहे.
“आपण झिजोनी अंगे स्वत:।
जीवजंतूशी द्यावी प्रसन्नता!!
सुखी करावी गावाची जनता ।
हीच सेवा पुण्यकर !!
या उंक्ती प्रमाणे समाजासाठी काही तरी देणे लागते, या भावनेतून मदतीचा हात देण्याचा छोटासा प्रयत्न केला असून, यातून आत्मिक समाधान मिळालं याचा आनंद आहे असे सरपंच पुत्र आप्पा कदम यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलतांना सांगितले आहे.