खामगावकरांची पारंपरिक माठ विक्रीच्या व्यवसायाला पसंती
खामगाव : फेब्रुवारी – मार्च महिना संपता कोरोना सवे उन्हाळ्याचे सुद्धा आगमन झाले आहे. उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरवात होताच दिवसेंदिवस उन्हाचे चटके वाढायला लागले आहेत. खामगाव चे तापमान सुध्दा गेल्या काही दिवसांपासून कमालीचे वाढले असून वाढत्या उन्हाच्या प्रहरा मध्ये थंड पाण्याविना तहान भागवन्यासाठी माठाच्या व्यवसायाला मंदी चा सामना करत पुन्हा सुगीचे दिवस येतांना दिसून येत आहेत.
कोरोना विषानूच्या पाश्वभूमीवर संपूर्ण लॉकडाउन सुरू आहे यामधेच खामगावकरांना उन्हाचा ४० डिग्री सेलसिअस इतका तडाखा सोसावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी फ्रीज चा वापर वाढला असून परिणामी पारंपरिक माठ विक्रीच्या व्यवसायाला मंदी ला सामोरे जावे लागले होते. कमी खर्चात व सहजरित्या उपलब्ध होणाच्या गरिबांचा फ्रीज म्हणजेच माठाच्या पाण्याचे अस्तित्व धोक्यात येऊन या व्यवसायावर चालणाऱ्या कुटुंबाच्या परंपरेवर धोका ओढवला होता मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या कहरामुळे लोकांना आरोग्यासाठी उपयोगी वस्तूंची खरेदी वाढली असून नैसर्गिक व पारंपरिक वस्तूंवर जास्त भर दिल्याचे चित्र दिसून येत आहे. माठाच्या पाण्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होत नाहीत व यामुळेच पिढ्यानपिढ्या फिरत्या चाकावर माठ बनऊन पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत. बाजार बंदी असल्या मुळे बाजारात विक्रीसाठी माठ आणता येऊ न शकले तरीही कुंभार वाड्यात माठ व मातीच्या अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची येजा वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी एकीकडे ग्राहकांनी मातीच्या माठांना पसंती देऊन दुसरीकडे आधुनिक यंत्रावरचा ग्राहकांचा विश्वास कमी झाल्याचे दिसून येत आहे.